स्वयंसेवी संस्थाः दशा आणि दिशा
स्वयंसेवी कार्याची परंपरा फार प्राचीन असली तरी तिचे आधुनिक संस्थात्मक स्वरूप समकालीन समाजव्यवस्थेमध्ये उदयास आले आहे. आधुनिक आर्थिक-राजकीय व्यवस्था भांडवलशाही स्वरूपाची असल्यामुळे व तिला कल्याणकारी लोकशाहीप्रधान करण्यापलिकडे (तेही अपूर्णावस्थेतच) भारतामध्ये व इतरत्रही फारसे साध्य करणे अजूनपर्यंत यशस्वी झाले नाही. स्वयंसेवी संस्था व चळवळ यांची दशा व दिशा काय आहे हे समजून घेण्यापूर्वी सध्याची राजकीय स्थिती …